- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Thermosteel Bottles:गार व गरम राहणाऱ्या स्टील बाटल्या
मागील https://paisevasool18.blogspot.com/2021/05/cold-water-bottle.html Cold water bottle थंड पाण्यासाठी बाटल्या या ब्लॅाग मध्ये गार पाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या बाटल्यां विषयी संपूर्ण माहिती आपण घेतली आहे. आज आपण पाणी, चहा ,कॅाफी वगैरे गार व गरम ठेवणाऱ्या बाटल्यां विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
थर्मोस्टील बाटली म्हणजे काय ?
What is thermosteel bottle ?
थर्मोस्टील या नावावरून लक्षात येते की, या स्टील च्या बाटल्या असणाऱ ज्या थर्मासचे काम करतात,आणि हे बरोबर देखील आहे. पू्र्वी आपण काचेचे थर्मास वापरत होतो, नंतर काचे सारखेच स्टीलचे थर्मास आले व या स्टीलच्या थर्मासला बाटलीचा आकार देऊन , थर्मोस्टील बॅाटल तयार झाल्या. थर्मोस्टील बॅाटल मध्ये चोवीस तासांपर्यंत पदार्थ गार किंवा गरम राहू शकतात.
थर्मोस्टील बाटल्या कशा बनलेल्या असतात ?
How thermosteel bottles are made ?
थर्मोस्टील बाटल्या ह्या 18/8 stainless steel किंवा 304 stainless पासून बनविलेल्या असतात. थोडक्यात असे स्टील की जे आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगले आहे व ज्यापासून चांगल्या दर्जाच्या गृहोपयोगी वस्तू बनविल्या जातात. या स्टीलला लोहचुंबक चिकटते परंतु हे उत्तम गंजरोधक स्टील आहे. ह्या स्टील पासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनविणे शक्य असते व हे स्टील कमी उष्णता वाहक असते. यामुळे थर्मास बाटली बनविताना, हे स्टील वापरले जाते.
या बाटल्या स्टीलच्या दोन वेगळ्या थरांमधून बनलेल्या असतात. थोडक्यात एका बाटलीच्या आत , तशीच पण थोडी छोटी बाटली ठेऊन , दोन्ही बाटल्या एकत्र जोडून एक अखंड बाटली तयार केलेली असते. या दोन्ही बाटल्यांच्या मध्ये निर्वात पोकळी असते. यालाच म्हणतात व्हॅक्यूम क्रिएट करणे. यांमुळे बाटलीच्या आतील तापमानावर बाहेरील तापमानाचा प्रभाव पडत नाही. याशिवाय या निर्वात पोकळीत,आतील बाटलीच्या वर तांब्याचे कोटींग असते. हे तांबे उष्णता परावर्तनाचं काम करते , की ज्यामुळे बाहेरील तापमान तांब्याच्या कोटींग मुळे बाटलीच्या आतील तापमानावर परिणाम करू शकत नाही.
या बाटल्यांचे तोंड स्टीलचेच आहे परंतु यांचे झाकण मात्र बाहेरून स्टील असते पण आतून लॅस्टिकचे असते. हे फिरवून लावण्याचे झाकण आहे. हे जर पूर्ण स्टीलचे बनविले तर स्टील वर स्टील घासून काही दिवसांत झाकण खराब होऊ शकते. परंतु प्लॅस्टिकचे झाकण असल्यामुळे हे कितीही वेळा सहजी उघड-बंद करता येते. शिवाय यामुळे बाटली एअरटाइट , लिकप्रूफ राहते. म्हणजे भरलेली बाटली आडवी झाली तरी यांतून बाहेर काही सांडण्याची शक्यता नसते.
थर्मोस्टील बाटलीचे साइज/आकार
Size and shape of hot and cold bottles
या बाटल्या साधारणत: एक कप ते वीस कप चहा ठेऊ शकू एवढ्या आकारात उपलब्ध आहेत. दीडशे एमएल ते दोन लीटर एवढी यांची क्षमता आहे. अर्धा,एक,दीड,दोनलीटर या सामान्य प्रमाणाच्या बाटल्या मुबलक मिळतात. दीडशे, साडेतीनशे, साडेसातशे ,अठराशे,बाव्वीशे, एमएल असे साइज देखील उपलब्ध आहेत.
या बाटल्या नेहेमीच्या स्टील सारख्या रंगात आहेत परंतु यामध्ये लाल,निळा, हिरवा,पिवळा असे विविध रंग देखील मिळतात. किंमतीत मात्र फारसा फरक नसतो. या बाटल्या वेगवेगळ्या स्पोर्टी लुक मध्ये देखील मिळतात ज्या दिसायला अधिक सुंदर असतात.
थर्मोस्टील बाटलीचा वापर कशासाठी करु शकतो ?
What is use of hot and cold thermosteel bottles ?
थर्मोस्टील बाटलीचा वापर द्रवरुप पदार्थ अधिक काळ गार किंवा गरम ठेवण्यासाठी करु शकतो. पण यांत आपण काय ठेऊ शकतो ? तर गार किंवा गरम पाणी, गार-गरम कॅाफी,चहा, सरबत,ज्युस,वरण,आमटी ,सार,ताक इत्यादी. यामध्ये गार दूध आपण ठेऊ शकतो.
गरम दूध ठेवले तर ते नासण्याची शक्यता जास्त आहे. बाटली अस्वच्छ असणे हे गरम दूध नासण्याचे कारण नाहीये. तर खरे कारण हे आहे की ,दूध नासण्याकरीता त्यातील बॅक्टेरीया कारणीभूत असतात. ठराविक उष्ण तापमान बराच वेळ मिळाल्यानंतर,त्यांची झपाटयानं वाढ होते व दुधातील लॅक्टोज चे रुपांतर ते लॅक्टीक ॲसिड मध्ये करतात यामुळे दूध नासते. गरम-गरम दूधाचे पातेले आपण झाकून ठेवले तरी दूध नासते.
थर्मोस्टील बाटलीत किती वेळ गार/गरम राहते ?
How long beverages remains hot or cold in thermal bottles ?
या बाटल्यंमध्ये गार पाणी चोवीस तास गार राहू शकते तर गरम पाणी अठरा तास गरम राहू शकते. चहा किंवा कॅाफी देखील एवढाच वेळ गरम-गार राहू शकते. परंतु यासाठी अट आहे. बाटली वापरण्यापूर्वी ती प्री कंडिशन करुन घ्यावी लागते. म्हणजे काय तर - जर आपण गरम चहा-कॅाफी ठेवणार असेल तर , प्रथम बाटलीत गरम पाणी पूर्ण भरुन ठेवावे,झाकण लावून. पाच मिनिटांने पाणी काढून टाकून,बाटलीत गरम चहा किंवा कॅाफी भरावे. याच पद्धतीने जर आपण बाटलीत , थंड ज्युस,सरबत ठेवणार आहोत , तर प्रथम पाच मिनिटां करिता , बाटलीत थंड पाणी भरुन ठेवावे व नंतर ते काढून , त्यात ज्युस भरावे.
आणखी एक अट आहे , जर आपल्याला जास्त वेळे साठी गरम किंवा गार ठेवायचे असेल तर , बाटली,तिच्या तोंडापर्यंत संपूर्ण भरावी व शक्यतोवर ती कमीत-कमी वेळा उघड-बंद करावी. बाटलीतील पेय थोडे काढून घेतल्यावर ताबडतोब बाटलीचे झाकण लावावे, म्हणजे बाटलीत शिल्लक असलेले पेय आहे तसेच गरम / गार राहिल. बाटलीत बाहेरील हवा जेवढी कमी जाईल,तेवढेच बाटलीतील पेय अधिक वेळ थंड किंवा गरम राहिल.
थर्मोस्टील बाटल्यांच्या किंमती
Price of hot and cold thermosteel bottles.
आपण जर एक लीटर प्लेन स्टील थर्मोस्टील बाटलीचा विचार केला तर , या बाटलीची किंमत सहाशे रुपयांपासून बाराशे रुपयां पर्यंत आहे. बाटलीचे वजन ,ऐक्च्युअल कपॅसिटी व कंपनीचे नाव यांवर किंमत ठरते. आकाराने सर्व बाटल्या एकसारख्या दिसतात परंतु वजनात फरक असू शकतो. कमी वजनाची अर्थात कमी किमतीत मिळणार. सरासरी वजन ५२५ ग्रॅम आहे. ऐक्च्युअल कपॅसिटी पाहिली तर १००० मिली लीटर आहे. परंतु काही बाटल्यांच्या नावांपुढे १००० चा आकडा लिहिलेला असतो पण त्यांची कपॅसिटी ८०० ते ९०० एम एल असते. मिल्टन,सेलो,प्रेस्टिज,बोरोसिल,सिग्नोरावेअर,ॲटलास व इतर ब्रॅंडेड कंपनीची एक लीटर बाटली हजार रुपयांपर्यंत मिळते. यांची एमआरपी वेगवेगळी असली तरीही. दीड लीटर बाराशेच्या आसपास तर दोन लीटर पंधराशेच्या आसपास मिळू शकते.
छोट्या बाटल्यांसाठी मटेरियल कमी लागत असले तरी त्या बनविण्यासाठी मेहनत मोठ्या बाटल्यांपेक्षा जास्त जाते. त्यामुळे लहान बाटल्या फार स्वस्त नसतात. दीडशे एम एल चारशेच्या पुढे,साडेतीनशे एम एल पाचशेच्या पुढील किमतीत मिळू शकते. अर्धा ते पाऊण लीटर बाटली सहाशे ते नऊशे रुपयांना मिळते.
स्पोर्टी लुक असणाऱ्या बाटल्या साधारण अर्धा ते एक लीटर आकाराच्या असतात. यांची किंमत सहाशे ते बाराशे रुपयांपर्यंत आहे.
कोणती थर्मोस्टील बाटली घ्यावी ?
Which hot and cold thermosteel bottle is suitable ?
थर्मोस्टीलच्या या बाटल्या मुळांत चीनमध्ये तयार होतात. चीनमधील वेगवेगळ्या कंपन्यांकडून, भारतातील कंपन्या या आयात करतात. येथे त्यांना पॅालिश करुन भारतीय कंपनीचा शिक्का मारला जातो व बॅाक्स पॅक करुन विकले जाते. यामुळे यांची क्वॅालिटी साधारण सारखीच असते. वजनात किंवा कपॅसिटीत फरक असू शकतो. ब्रॅंडेड कंपन्या एक वर्षांची गॅरंटी देतात.
पाण्यासाठी बाटली घेताना थोडी मोठीच घ्यावी कारण उन्हाळयात पाणी पुरत नाही. पाणी थोडा कमी वेळ थंड किंवा गरम राहिले तर चालू शकते.
इतर कोणतेही पेय ठेवण्यासाठी बाटली घेताना आपणांस जेवढ्या साइजची जरूरी आहे , तेवढीच घ्यावी. स्वस्त आहे म्हणून मोठा साइज घेऊ नये. अर्धा लीटर बाटलीत आपण दोन कप चहा ठेवला तर तो लगेच गार होऊ शकतो. मोठ्या बाटलीत जर आपण कमी पेय ठेवले तर बाटलीतील रीकाम्या जागेत वातावरणातील हवा भरली जाते व बाटलीतील पेयाच्या तापमानात फरक पडतो. बाटली आपण जेवढ्या वेळा उघडतो, त्या प्रत्येक वेळी बाटलीत बाहेरील हवा जावून, आतील पेयाचे तापमान वाढवू किंवा कमी करु शकते.
थर्मोस्टील बाटल्यांचा फायदा
Advantages of hot and cold thermosteel bottles.
या बाटल्या दिसायला सुंदर आहेत. चार- चौघांत वापरताना स्टॅंडर्ड जपले जाते. पाणी किंवा आपले आवडते पेय आपण यांत ठेऊन कुठही घेऊन जावू शकतो. शाळा,कॅालेज,घर,ॲाफिस,दुकान,किंवा प्रवासांत देखील ही बाटली आपण जवळ बाळगू शकतो. घरात बनविलेल्या शुद्ध,स्वच्छ , थंड-गरम पेयाचा आपल्याला हव्या त्या वेळी आस्वाद घेऊ शकतो. बाहेरील पदार्थ टाळू शकतो. बॅग,सॅक,पर्स,किंवा गाडीच्या डिकीतही सहजी कॅरी करु शकतो. या बटल्या टिकाऊ आहेत. तूट-फूट होण्याची शक्यता फार कमी आहे. दिर्घकाळ वापरु शकतो.
थर्मोस्टील बाटल्यांची काळजी न घेतल्यास होणारे नुकसान
Disadvantages of hot and cold thermosteel bottles
रोजच्या वापरात बाटलीत २४ तास गरम व १८ तास थंड राहत नसते. ( फक्त अटी/शर्तींसह राहू शकते,ज्यांचा वर उल्लेख केला आहे )
बाटली साफ करायला सोपी असली तरी घासून - घासून काही काळाने यावर स्क्रॅचेस येऊ शकतात. रंगीत व स्पोर्टी बाटल्यांचा रंग अधे-मधे कुठेही निघू शकतो व त्यांचे सौंदर्य नष्ट होते.
या बाटल्या हाताळण्यास सोप्या असल्या तरी पडझड झाली किंवा अयोग्य हाताळणी मुळे याला कोचे किंवा बेंड येतात,बाटलीच्या निर्वात पोकळी वर याचा परिणाम होतो. थंड/गरम राहण्याचे प्रमाण कमी होते किंवा राहतही नाही.
यांचे झाकण प्लॅस्टिकचे असल्यामुळे ते तुटण्याची शक्यता नाकारतां येत नाही. या झाकणावर एक रबर वायसर/ रिंग असते. ही छोटीसी रिंग बाटलीला एअरटाइट करण्याचे काम करीत असते. ही रींग तुटली किंवा हरवली तर बाटलीतील पदार्थ बाहेर येऊ शकतात. शिवाय बाटलीत पहिल्या सारखे गरम/थंड राहत नाही. नवीन योग्य साइजचे झाकण किंवा वायसर मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
दूध व कार्बोनेटेड पेय म्हणजे सोडा, पेप्सी, बिअर इत्यादी साठी बाटलीचा वापर करुच नये. शिवाय ॲसिडीक पेय जसे ताक , लिंबु सरबत , लेमन/ॲारेंज ज्युस यांसाठी देखील या बाटल्यांचा वापर शक्यतोवर टाळावा. ही पेय फार वेळ एअरटाइट राहिल्याने त्यांची चव बदलते. हि बाटली जरी उत्तम क्वॅालिटी स्टीलची असली तरी कोणत्याही मेटल वर ॲसिडीक पदार्थांचा परिणाम होत असतो. या पदार्थांच्या सततच्या वापराने स्टीलवर देखील काहीसा परिणाम होतो शिवाय बाटलीला दुर्गंध येत राहतो.
Remove bad odour from thermosteel bottle
टिप : बाटलीला दुर्गंध येऊ नये यासाठी बाटलीतील पेय संपून बाटली रिकामी झाली की लगेचच पाण्याने विसळून घ्यावी , ते शक्य नसेल तर बाटलीचं झाकण न लावता ती उघडीच ठेवावी,शक्यतोवर. बाटली ब्रश व साबण किंवा वाशिंग पावडर ने आतून स्वच्छ केल्यावर बाटलीचे झाकण न लावता उघडीच ठेवावी, जोपर्यंत बाटलीच्या आतील वास नाहिसा होत नाही तोपर्यंत.
वरील ब्लॅाग मध्ये आपण थंड व गरम राहणाऱ्या Hot and cold thermosteel bottles बद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे. तरी आपल्या काही शंका असल्यास कॅामेंट करा व लेख आवडला असल्यास आपल्या पैसा वसूल मराठी ब्लॅागला फॅालो करा.
टिप्पण्या
खूप चांगली माहिती दिली आहे. मी काल अशी बाटली घ्यायच्या विचारात होते. घरातील वयस्कर व्यक्तींसाठी पिण्याचे पाणी सतत गरम करावे लागते.माहिती व किंमत संगितलीत त्यामुळे ती विकत घेण्यास मदत होईल. त्याबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवा