सफरचंद कापण्याचे यंत्र
ॲन ॲपल अ डे,किप डॅाक्टर अवे! असे म्हणतात. का? तर सफरचंद मध्ये आरोग्याचे संवर्धन करणारे काही महत्त्वाचे घटक असतात ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
सफरचंद चे गुणधर्म
१) सफरचंद मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. लोह रक्तातील हिमोग्लोबिनच्या वाढीस उपयुक्त घटक आहे. एनिमियामुळे शरीरात रक्ताची जी कमतरता निर्माण होते,ती सफरचंद खाण्यामुळे काही अंशी भरुन येते. २) रोज सफरचंद खाल्यावर गाल सफरचंद सारखे गोल,गुबगुबीत,लाल होतात असे म्हणतात. होतात की नाही माहित नाही पण एवढे नक्की की त्वचेसाठी पोषक द्रव्य सफरचंद मध्ये भरपूर असतात.ज्यामुळे चेहऱ्यावर तजेला येऊ शकतो. ३) सफरचंद शरीरातील कोलेस्ट्रॅाल चे प्रमाण कमी करते.साखरेचे प्रमाण मर्यादित करते यामुळे हृदय विकाराच्या धोक्यापासून काहीसा अटकाव केला जातो. ४) सफरचंदामुळे चव मिळते व पोटही पुरेसे भरते.ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांनी रोज दोन सफरचंद खाल्ली तर जिभेवर व पोटावर नियंत्रण येईल. ५) सफरचंद रक्तप्रवाह सुरळीत ठेऊन,रक्त वाढीस उपयुक्त मानले जाते.मेंदूस अखंडीत रक्तप्रवाह होत असल्यास अल्जाइमर सारख्या धोक्यापासून बचाव होतो व स्मरणशक्ती चांगली राहते. ६) सफरचंद व्यवस्थित चावून खाण्यामुळे पाचनशक्ती वाढते. त्यातील ॲंटीपॅायझन तत्व अन्नातील विषकारक पदार्थांचा नाश करुन,अन्न पचविण्यास मदत करते. ७) सफरचंद मध्ये साइडर विनेगर तत्व असते. जे किडनी स्टोन व इतर आजारांवर गुणकारक आहे. ८) सफरचंद रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे करीता उपयोगी आहे. ९) सफरचंद मध्ये जीवनसत्व अ असते.अ जीवनसत्व दृष्टीदोष निवारण्यास उपयुक्त ठरते. वरील सर्व कारणांमुळे रोज सफरचंद खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. सफरचंद कटर का वापरावे ?
सफरचंद कापण्याकरीता आपण सूरी, चाकू,विळीचा वापर करतो. बरेच वेळा कांदा व मांसाहारी पदार्थ आपण त्यांच सूरी,चाकू ने कापतो. त्याचा वास सफरचंदास येतो. सफरचंद खाताना कडू बिया कधी तोंडात जातात. यापेक्षा एक सफरचंद कटर वापरले तर एका मिनिटांत सफरचंदच्या एकसारख्या फोडी करता येतात. त्याचा बियांचा भाग वेगळा होतो.शिवाय लहान-मोठ्या आकारांचे सफरचंद देखील व्यवस्थित कापले जातात. एकसारखे भाग दिसायला सुंदर वाटतात,खायला गोड लागतात. हे सफरचंद कटर फार महाग ही नसतात व भरपूर काळ टिकू शकतात. सफरचंद यंत्र कसे वापरावे
सफरचंद कटर वापरताना,एका प्लेट वर सफरचंद ठेवावे,कटर सफरचंदच्या वर,मधोमध धरुन,कटरच्या दोन्ही बाजूंवर जोर देवून तळाकडे न्यावे. सफरचंदच्या एकसारख्या आठ फोडी होतील. मधील बियांचा भाग वेगळा होईल. अशा प्रकारचे कापलेले सफरचंद छान दिसते. सीडलेस ॲपलची मजा चाखतां येते व चवीला अधिक गोड वाटते. ॲपल कटरची क्वॅालिटी व किमती
बाजारात मिळणारे साधारण सफरचंद कापायचे यंत्र खालीलप्रकारचे असते.
हे यंत्र सामान्यतः प्लॅस्टिकचे असते. याच्या मधोमध स्टिलची धारदार पाती असतात.ही पाती प्लॅस्टिक मध्ये खोचून एकसंध केलेली असतात. या पात्यांच्या खालील बाजूस धार असते,वरती सामान्य प्लेन असतात.अशा प्रकारचे २०-२५ कंपन्यांचे ॲपल कटर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. बहुसंख्य सफरचंद कटर,सफरचंदचे एकसारखे आठ भाग करतात. काही कटर बारा तुकडे करु शकतात. शिवाय प्लॅस्टिकचा अजिबात वापर न करता संपूर्ण स्टीलचे बनवलेले ॲपल कटर देखील मिळते. ॲपल कटरची किमंत अगदी २५ रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहे.
कोणत्याही ॲपल कटर बॅाक्सवर स्टेनलेस स्टील ब्लेडस् असे लिहिलेले असते. तरीही लोहचुंबक त्या ब्लेडस् ला चांगलेच चिटकून बसते. याचा अर्थ ते स्टेनलेस स्टील नाही किंवा गंजणारे आहेत असा होत नाही. ज्या स्टेनलेस स्टिलला लोहचुंबक चिकटत नाही अशा स्टीलची धार कधीही फार काळ टिकत नाही. त्यामुळेच ॲपल कटर साठी मॅग्नेटिक स्टेनलेस स्टील वापरले जाते.ॲपल कटरच्या ब्लेडला कधी धार करण्याची आवश्यक्ता पडत नाही. व ते स्टेन-लेस म्हणजे गंज रोधक ही राहते.
फार स्वस्त ॲपल कटर घेवू नये. ते गंजण्याची शक्यता असू शकते.यांचे ब्लेडही फार पातळ असतात. ते तुटण्याची शक्यता नाकारतां येत नाही. स्वस्त ॲपल कटरचे प्लॅास्टिक थोडे जाडसर व कठीण वाटते. प्लॅस्टिकचे रंग गडद,काळसर व निस्तेज असतात.चांगल्या प्लॅस्टिकचे रंग चमकदार,उठावदार असतात व प्लॅस्टिकचा स्पर्श मऊ जाणवतो. पन्नास-साठ रुपयांत ठिक-ठाक ॲपल कटर मिळू शकते जे पैसे वसूल होईपर्यंत टिकू शकते.
चांगले टिकाऊ पाहिजे असेल तर अंजली किंवा इतर काही कंपन्यांचे कटर मिळतात. यांचे ब्लेड प्लॅस्टिक मध्ये खोचलेले नाहीत तर प्रत्यक्षात स्टीलशीच जोडलेले आहेत. ते निघून यायची शक्यता नाही.ब्लेडची चमक,जाडी व मजबूती लक्षात येते. कटरच्या दोन्ही बाजूंना प्लॅस्टिक ने कवर केल्याने ज्यावेळी कटर आपण सफरचंदवर प्रेस करतो तेव्हा या बाजू हातात रूतत नाही. याऐवजी संपूर्ण स्टील चे ॲपल कटर असेल तेव्हा ते सफरचंद वर दाबताना स्टीलचे कोपरे हाताला टोचतात ॲपल कटरची निगा
ॲपल कटर वापरुन झाल्यावर स्वच्छ धुवून कोरडे करुन ठेवावे,म्हणजे किडे-मुंग्या त्यांवर फिरणार नाहीत. याच्या ब्लेडची धार बोटांना सहजी कापू शकते त्यामुळे धुताना काळजी घ्यावी. ॲपल कटरचा वापर रेग्युलर करावा. बरेच दिवस न वापरतां पडून राहिले तर त्याला गंज लागू शकतो.
ॲपल कटरचा वेगळा वापर
ॲपल कटरचा वापर मऊ पेरु,वांगी,कडक टमाटे,उकडलेले अंडे,उकडलेले बटाटे यांच्या एकसारख्या फोडी करण्यासाठी होऊ शकतो. स्लाइस केक,स्लाइस आईस्क्रीम,कलिंगड व अननसाच्या स्लाइसचे एकसारखे लहान तुकडे करण्यासाठी ॲपल कटर वापरतां येईल,फ्रूट सॅलेड साठी.इडली फ्राय साठी इडली कट होईल. तसेच आम्लेट,उत्तप्पा,थालीपीठ,खाऱ्या किंवा गोड पुऱ्या,कापण्या यांसारख्या पदार्थांची चव जरा वेगळ्या आकारात घेतां येईल.असो,या लेखांत आपण सफरचंद कापण्याच्या यंत्रांबाबत बरीच माहिती घेतली आहे. लेख आवडला असल्यास आपल्या paisevasool18 ब्लॅाग ला फॅालो करा.अधिक माहिती Paise Vasool युट्यूब चॅनेलवर पहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
या ब्लॅाग मध्ये संपूर्ण अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत की ज्यामुळे कोणत्याही वस्तू विषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,तरीही काही कमतरता जरुर राहू शकतात. कृपया आपल्या सूचना व मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. आपले विचार जरुर नोंदवा व ब्लॅागला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!