- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Artificial Flowers कृत्रिम फुले
फुले कोणाला आवडत नाही ? रंगबिरंगी फुले मन मोहवून टाकतात.चित्त प्रसन्न करतात.भान उल्हासित करतात.वातावरण सदाबहार करतात.लहानांपासून मोठ्यापर्यंत,स्त्री किंवा पुरुष सर्वांना ताजेतजेले,सुगंधित फुले भुरळ पाडतात.घर,ॲाफिस,दुकाने,शाळा,कॅालेज,कंपन्या,कारखाने अशी सर्वच ठिकाणे वेगवेगळ्या कारणांनी फुलांनी सजविली जातात.एरवी छोट्या-मोठ्या फुलदाण्या (Flower Pot) आवर्जून ठेवल्या जातात.
फुलांची आपल्याला कितीही आवड असली किंवा गरज असली तरी सर्व प्रकारची फुले , सर्व गांवांत- शहरांत उपलब्ध कधीच नसतात.बदलत्या हंगामानुसार आपल्या फुलदाणीतील फुले बदलली जातात.फुलांच्या किमतीही रोज बदलतात. कधी किंमत इतकी जास्त होते की आपली फुलदाणी रिकामी ठेवण्यास पर्याय नसतो. फुलदाणी रिकामी ठेवण्यापेक्षा मग कृत्रिम फुले जर त्यात ठेवली तर काय हरकत आहे ?
कृत्रिम फुले कशी आहेत
कृत्रिम फुले इतकी सुंदर दिसतात की थोडे दूरुन पाहिले लक्षात येत नाही हि खरी की खोटी. यामध्ये आपण सजावटीला वापरतो ती सर्व फुले उपलब्ध आहेत.कमळ, गुलाब,लिली,ॲस्टर,ट्युलिप व इतर अनेक प्रकारची फुले अगदी हुबेहुब मिळतात.इतकेच नाही तर जी आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे ती चाफा,जास्वंद,झेंडू अशी फुले ही उपलब्ध आहेत. फुलांच्या पाकळ्या,दांडी,फांदी,पाने सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करुन ही फुले बनविलेली आहेत.
कृत्रिम फुले कशाची बनलेली आहेत
कृत्रिम फुले हि कागद,कापड,सिल्क,लिनन,पॅालिमर,नायलॅान,प्लॅस्टिक,पॅालिस्टर व इतर साहित्यांपासून बनविली जातात.पॅालिस्टर पासून बनविलेली फुले अधिक नैसर्गिक दिसतात.पॅालिस्टर फॅब्रिकला पाहिजे तसा रंग,डिझाईन,आकार देणे शक्य असते.यांतून बनविलेल्या फुलांच्या नाजुक पाकळ्या खऱ्या फुलांचा आभास घडवितात.पॅालिस्टर नुसत्या हाताने ओढून फाटत नाही.पाण्याने याचा रंग जात नाही.यामुळे पॅालिस्टरची कृत्रिम फुले दिर्घकाळ टिकू शकतात.
कृत्रिम फुले कोठे तयार होतात
जगात वापरल्या जाणाऱ्या पॅालिस्टर कृत्रिम फुलांतील ऐंशी टक्के वाटा चीनचा आहे.तेथे शेकडों असे कारखाने आहेत की जे गेल्या चाळीस वर्षांपासून फक्त कृत्रिम फुले,फळे,झाडे-झुडपे बनवित आहेत.हजारो कंटेनर भरुन ते जगभर पाठवित आहेत.
कृत्रिम फुले का वापरावीत
नैसर्गिक,खरी फुले सर्व वातावरणांत,सर्व ठिकाणी उपलब्ध नसतात. अशा वेळी कृत्रिम फुले आपली गरज भागवतात. ताजी फुले एक दोन दिवसांत कोमेजून जातात. फुलदाणीमध्ये किंवा घर/ॲाफिस सजवताना किंवा कोणत्याही कार्यक्रम किंवा सण-समारंभात वापरताना खऱ्या फुलांचा व्यवस्थित रख-रखाव करावा लागतो.कृत्रिम फुले हाताळताना फार काळजी करावी लागत नाही. एकदा सजवून ठेवली की त्यांना काही मेंटेन करायची जरुरी पडत नाही.कित्येक दिवस ते ताज्या फुलांसारखे टवटवीट दिसतील.किमतीतही हि फुले खऱ्या फुलांपेक्षा स्वस्त असतात व दिर्घकाळ टिकतात. कृत्रिम फुले थोडक्या पैशांत घर,ॲाफिस,दुकानांची शोभा वाढवतात.पाहुण्याना,क्लायंटना,ग्राहकांना भुरळ पाडतात. त्यामुळे हि फुले आपले पैसे वसूल करुन देतात.
किंमत
येथे दर्शविलेली सर्व फुले ही पॅालिस्टरचीच आहे.फुलांच्या किमतीत फुलांची संख्या,फांद्या,पाने या सर्व गोष्टींचा अंतर्भूत असतात. पाच फुलांच्या सेटची किंमत दीडशे-दोनशे रुपये असते. फांद्यांविरहित सुट्टी फुले अगदी दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत मिळतात.झेंडू सारख्या फुलांची माळ शंभर रुपयांत मिळू शकते. फुलांचे प्रकार,रंगसंगती व त्याचे नैसर्गिक रूपाशी किती साम्य आहे यांवर किंमत ठरते.या फुलांनी सजविलेली तयार फुलदाणी दोनशे पासून हजार रुपयांपर्यंत मिळते.कृत्रिम फुलांच्या किमती देखील बदलत राहतात मागणी व पुरवठा यानुसार बदलत जातात.ॲानलाइन आपल्याला यांच्या किमतीची पडताळणी करता येऊ शकते.
कृत्रिम फुलांची काळजी
या फुलांची फारशी काही काळजी करण्याची गरज पडत नाही.फक्त धूर,धूळ,प्रदूषण यामुळे यांच्यावर डाग येतात.साधा साबण,वॅाशिंग पावडर किंवा जेल यांच्या पाण्यात सर्व फुले ४ -५ तास भिजवून नंतर नळाच्या साध्या पाण्याखाली धुतले की नवीन होतात. साबण/पावडर स्ट्राँग व जास्त प्रमाणांत वापरू नये. उन्हामुळे यांचा रंग फार लवकर फिक्का पडतो. त्यामुळे सावलीच्या ठिकाणी यांचा वापर करावा. वातावरणाचा यांच्यावरही परिणाम होत असतो. काही काळानंतर ही फुले निस्तेज दिसू लागतात. तोपर्यंत बहुदा आपले पैसे वसूल झालेले असतात.
कृत्रिम फुले का वापरु नये
खरे सोने व एक ग्रॅमचे सोने यांत जसा फरक आहे ,त्याप्रमाणे खऱ्या फुलांत व खोट्या फुलांत फरक करता येईल. प्रत्येकाचा स्वत:चा निर्णय आहे, खरे सोने वापरायचे की एक ग्रॅमचे,की काहीच नाही. हि फुले बनविताना अनेक रसायनांचा वापर केला जातो. बहुसंख्य रसायने आरोग्यवर्धक कधीच नसतात. या फुलांमुळे काही अपाय होतो असे निदर्शनास आलेले नाही परंतु खऱ्या फुलांमुळे जो तजेला मिळतो तो यांपासून मिळत नाही एवढे नक्की.नैसर्गिक फुले नंतर लगेच निसर्गात मिसळतात.या फुलांच्या नैसर्गिक विघटनास कित्येक वर्षांची काळ जावा लागतो.
असो या लेखांत आपण कृत्रिम फुलांविषयी बरीच माहिती घेतली आहे. आवडली असल्यास आपल्या paisevasool18 ब्लॅागला फॅालो करा.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
या ब्लॅाग मध्ये संपूर्ण अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत की ज्यामुळे कोणत्याही वस्तू विषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,तरीही काही कमतरता जरुर राहू शकतात. कृपया आपल्या सूचना व मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. आपले विचार जरुर नोंदवा व ब्लॅागला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!