- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
How to use measuring cups ? Grams and ml
मेजरिंग कप चा वापर कसा करावा ? ग्रॅम व मिलीलीटर
Why we use measuring cups ?
मेजरिंग कप कशासाठी वापरतात ?
मेजरिंग कप ही आता स्वयंपाक घरातील अत्यावश्यक वस्तू झालेली आहे. कोणताही नवीन पदार्थ बनविताना तर यांची फारच निकड जाणवते. कोणत्याही पक्वांनाची चव त्यातील घटक द्रव्यांवर अवलंबून असते.ही घटकद्रव्ये योग्य प्रमाणात असतील तर पदार्थ अधिक स्वादिष्ट होतात. कोणताही पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीचे योग्य प्रमाण ठरविण्यासाठी मेजरिंग कप चा वापर केला जातो.
Measuring cups design
मेजरिंग कप चे स्वरुप
मेजरिंग कप हे प्लॅस्टिक,स्टिल,सिलिकॅान पासून बनवलेले असू शकतात. ह्या कप चा एक संच विकत मिळतो. हा संच चार ते सहा नगांचा असू शकतो. साधारणत: चार नगांचा संच जास्त प्रमाणात वापरला जातो. या चार ही कप वर त्यांचे मापे लिहिलेली असतात. हे माप १ कप, १/२ कप, १/३ कप, १/४ कप अशापद्धतीने लिहिलेले असते , मोठ्यापासून - लहान कप पर्यंत. बहुतेक कप वर मिलीलीटर मध्ये देखील माप लिहिलेले असते. २५० मिली, १२५ मिली, ८० मिली, ६० मिली मोठ्यापासून - लहान कप पर्यंत. पण हे अगदी तंतोतंत माप नाहीये. हे त्या कप ने ढोबळ मानाने मोजलेल्या द्रव पदार्थाचे माप आहे. त्या द्रव पदार्थात पाणी,तेल,दूध हे सर्वच आले. एक लीटर पाण्याचे वजन एक किलोग्रॅम असते. तर एक लीटर दूधाचे वजन एक किलो पेक्षा तीस-चाळीस ग्रॅम जास्त असते तर एक लीटर खाद्य तेल नऊशे ग्रॅम च्या आसपास असते.
कप चे मिलीलीटर मधील माप
१ कप = २५० मिली १/२ कप = १२५ मिली १/३ कप = ८३ मिली १/४ कप = ६० मिली २/३ कप = १६५ मिली ३/४ कप = १८८ मिली
How to use measuring cups
मेजरिंग कप चा वापर कसा करावा
तेल,दूध,पाणी तर आपण कप भरुन घेऊ शकतो , पण एक कप मैदा म्हणजे किती ? हा प्रश्न पडू शकतो. कारण मैदा तर आपण कपच्या काठाच्या वर देखील भरु शकतो.पण जेव्हा कप चे माप सांगितले जाते , तेव्हा ते कपच्या काठापर्यंतच अपेक्षित असते. जसे दूध किंवा पाणी जेवढे आपण घेऊ शकतो.तर जेव्हा आपण कप ने पीठ,रवा,मैदा,साखर वगैरे घेणार असतो तेव्हा कप च्या काठापर्यंत या वस्तूंची लेवल ठेवावी लागते. यासाठी सोपा उपाय आहे. कप रवा,मैदा,साखर इत्यादीने पूर्ण भरुन घ्यायचा.एका ताटलीवर तो कप धरून कपाच्या काठाला स्पर्श होइल या प्रकाराने बटर नाइफ कप वरुन फिरवावयाचा म्हणजे बरोबर कप ची लेवल मिळेल.बटर नाइफ ऐवजी आपण सूरी देखील वापरु शकतो.सूरीच्या उलट म्हणजे बोथट बाजूने.
Cup conversion to grams
कप चे ग्रॅम मधील वजन
कोणत्याही पदार्थाचे तंतोतंत वजन आपण कपच्या साह्याने सांगू शकत नाही.कारण पदार्थाचे वस्तूमान व आकारमान यांत फरक असतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण दोन किलो गहू दळण्यासाठी गिरणीत देतो तेव्हा आपल्याला पाच किलो पीठ मिळणार नसते , परंतु आपण ज्यामध्ये पाच किलो गहू , तांदूळ , साखर राहू शकते एवढा मोठा डबा दिलेला असतो , व साधारणत: तेवढा डबा भरेल एवढे पीठ आपल्याला मिळते. गव्हापेक्षा पीठाचे आकारमान वाढलेले असते. अशावेळी कपाने मोजायचे ठरविले तर एक कप गव्हाचे वजन एक कप पीठापेक्षा जास्तच असणार. प्रत्येक पदार्थाचे वस्तूमान,आकारमान व घनता यानुसार , प्रत्येक पदाथाचे आपल्याला वेगवेगळे वजन मिळणार , जरी आपण प्रत्येक पदार्थ एक कप घेतला तरी.एक कप साखर व एक कप पिठी साखर यांच्या वजनात देखील फरक पडतो.
१ कप चे ढोबळ मानाने वजन
मैदा/ पीठ = १३० ग्रॅम रवा/ पिठी साखर = १५० ग्रॅम दाणेदार साखर = २२० ग्रॅम तांदूळ = २०० ग्रॅम डाळी = १६० ग्रॅम काजू/बदाम = ११० ग्रॅम
असे वेगवेगळे वजन येते प्रत्येक पदार्थाचे.शिवाय प्रत्येक कंपनीच्या कपच्या आकारांतही थोडासा फरक असतो.त्यामुळे एका कंपनीच्या कर्वे मोजलेले वजन दुसऱ्या कंपनीच्या कपशी जुळेल असेही काही सांगतां येत नाही. फक्त एक अंदाज येण्यासाठी वरील वजन दर्शविलेली आहेत.
या लेखांत ही कल्पना तर आपल्याला आली आहे की मेजरिंग कप योग्य पद्धतीने आपण कसे वापरु शकतो. आपल्या काही शंका असल्यास जरुर विचारा, खाली कॅामेंट बॅाक्स मध्ये. वेगेवेगळ्या गृहोपयोगी वस्तूंबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या paisevasool18 ब्लॅाग ला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
या ब्लॅाग मध्ये संपूर्ण अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत की ज्यामुळे कोणत्याही वस्तू विषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,तरीही काही कमतरता जरुर राहू शकतात. कृपया आपल्या सूचना व मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. आपले विचार जरुर नोंदवा व ब्लॅागला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!