Glass Thermos / Vacuum Flasks काचेचे थर्मास

 Glass Thermos / Vacuum Flask                                 काचेचे थर्मास

      

        What are thermos / vacuum flasks ?
         थर्मास काय आहे ?

         थर्मास किंवा व्हॅक्यूम फ्लास्क म्हणजे असे एक पात्र किंवा साठवणुकीचे भांडे की ज्यामध्ये आपण एखादा पदार्थकाही काळासाठी , गार किंवा गरम राहण्या करिता ठेऊ शकतोयासाठी ना विजेची गरज लागत आणि ना कोणती क्रिया - प्रक्रिया करावी लागतेया भांड्यात ठेवलेले पदार्थ आजूबाजूच्या तापमानापेक्षा जास्त गरम किंवा थंड राहतातकाही काळाकरीताहे थर्मास किंवा व्हॅक्यूम फ्लास्क दोन पदरी असतात म्हणजे थर्मास च्या बाहेरील भाग  आतील भाग यांच्या मध्ये रिकामी जागा असतेथर्मास चे तोंड अशाप्रकारे सील केलेले असते की या रिकाम्या जागेत हवा जात नाही  निर्वात पोकळी तयार होतेम्हणून याला व्हॅक्युम फ्लास्क म्हणतातया निर्वात पोकळी मुळे बाहेरील तापमानाचा थर्मास मधील पदार्थाच्या तापमानावर परिणाम कमी होतोअशाप्रकारच्या काचेच्या थर्मास विषयी आज आपण जाणून घेणार आहोत


        Glass thermos/vacuum flasks 
         काचेचे थर्मास

Glass vacuum flasks


        काचेच्या थर्मास मध्येथर्मासच्या आतील भाग काचेचा तर बाहेरील भाग प्लॅस्टिकचा असतोप्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये काचेचे भांडे किंवा बाटली किंवा त्याला बल्ब देखील बोलतां येईल , अशा पद्धतीने बसविलेले असते की काचेचे  प्लॅस्टिक भांड्याचे तोंड एकमेकांना व्यवस्थित जुळून येईलहे तोंड पुन्हा रबर किंवा सिलिकॅान रिंग ने घट्ट केलेले असते की ज्यामुळे बाहेरील हवा काच  प्लॅस्टिक मधील मोकळ्या जागेत जात नाहीत्यामुळे बाहेरील हवेचा प्रत्यक्ष संपर्क थर्मास मधील पदार्थाशी येत नाही ,  त्याचे तापमान बराच वेळ आहे तसेच राहू शकतेकाच  प्लॅस्टिक हे दोन्ही उष्णतारोधक आहेतवातावरणातील तापमानाचा थर्मास मधील पदार्थावर होणारा परिणाम रोखण्यास ते मदत करतात  आतील पदार्थ जास्त वेळ गरम किंवा थंड राहतो

Inner sides of glass vacuum flasks


         ही काचेची बाटली किंवा भांडे किंवा बल्ब फार जाड काचेचा नसतोआपल्या नेहेमीच्या इलेक्ट्रिक बल्ब पेक्षा थोडा जाड असतोएवढेचया काचेच्या बाटलीचा बाह्य भाग संपूर्ण पणे चंदेरी मुलामा देवून बनविलेला असतोयाचा फायदा असा होतो की रेडिएशन मुळे निर्माण होणारी उष्णता रोखली जातेवातावरणातील इन्फ्रारेड किरणांना रोखण्यास हा चंदेरी मुलामा सक्षम ठरतो


        Size and price of thermos 
         काचेच्या थर्मास चे आकार  किंमत

Sizes of glass thermos


        काचेचे असे थर्मास दोनशे मिलीलीटर ते एक लीटर क्षमतेचे मिळतातयांची किंमत शंभर रुपये ते पाचशे रुपयांपर्यंत असतेया मध्ये सरळ बाटलीच्या आकाराचे किंवा जग किंवा मग च्या आकाराचे देखील असतातयांवर केलेल्या डिझाइन मुळे ते अधिक सुंदर दिसतात

Design on vacuum flasks



        Uses of thermos flasks 
         काचेच्या थर्मास चे उपयोग 

        आतमध्ये काच असणारे प्लॅस्टिकचे असे थर्मास आपण गरम किंवा थंड पेय ठेवण्यास वापरु शकतो यांचा वापर चहाकॅाफी,सरबत,ज्युस  इतर पेय ठेवण्यासाठी आपण करु शकतोयामध्ये ठेवलेले पेय साधारणतआठ तासांपर्यंत आहे त्या तापमानावर राहू शकते.फक्त एवढेच आहे की थर्मास कमीत-कमी वेळा उघड-बंद करणेबाहेरील हवा थर्मासच्या आत गेली नाही तर थर्मास मधील पदार्थ जास्त वेळ आहे त्या तापमानावर राहिल

Shape of glass thermos



        Why glass thermos flasks are best ?
         काच असणारे थर्मास का वापरावे ? 

        काचेच्या भांड्यांवर कोणत्याही खाद्य पदार्थांची रासायनिक क्रिया होत नाहीयादृष्टीने काचेची भांडी स्वयंपाकघरात सर्वात सुरक्षित मानली जातात.काच असणाऱ्या थर्मास मध्ये ठेवलेल्या पदार्थावर काचेचा काही दूष्परीणाम होत नाहीपदार्थांच्या नैसर्गिक जीवनसत्वांचा काचेमुळे ऱ्हास होत नाहीबराच वेळा नंतरही पदार्थांचा स्वाद टिकून राहतोखास करुन थंड सरबत  ज्युसेस काही काळ थंडच व स्वादिष्ट ठेवण्यास आपण या थर्मास चा वापर करु शकतोगरम चहा - कॅाफीच्या चवीत  तापमानात बराच वेळे नंतर ही फारसा फरक पडत नाही

Different sizes of glass vacuum flasks



    Why thermos flasks not suitable for hot milk ?
     थर्मास मध्ये गरम दूध ठेऊ शकतो काय ?

     फक्त अडचण एकच आहे की ,गरम दूध दोनतीन तासांनंतर नासू शकते.दूध नासण्याचे कारण हे त्यातील बॅक्टेरीया असतातथर्मास मध्ये ठेवलेले दूध आहे त्यांच तापमानावर बराच वेळ राहते पण या एकसमान उष्ण तापमानात बॅक्टेरीयांची मोठ्या संख्येने वाढ होते  ते दूध नासविण्यास कारणीभूत ठरतात


       Precautions while using glass thermos flasks 
       काचेच्या थर्मास ची निगा  

       काच असणारे हे प्लॅस्टिकचे थर्मास काळजीपूर्वकच हाताळावे लागतातया थर्मास मधील काच फार मजबूत नसतेधक्क्यामुळे किंवा हातातून निसटल्यामुळे देखील आतील काच फुटू शकतेहलक्या हाताने  मऊ बाटली ब्रशचा वापर करुन हे स्वच्छ करु शकतोधुताना घासणीचा वापर करणे टाळावे कारण प्लॅस्टिकवर स्क्रॅचेस येतात


        How to change thermos flasks glass 
         थर्मास ची काच कशी बदलतां येईल ?

        सर्व गोष्टींची काळजी घेतली तरी यांतील काच फुटू शकतेही काच आपण बदलू शकतोयाप्रकारचे थर्मास खालून म्हणजे त्यांच्या बुडातून उघडतां येतातथर्मास वरच्या बाजूला घट्ट पकडून त्याचा खालील भाग फिरविला की सहजी निघून येतोपण फक्त फूटलेली काच काढण्या करिता थर्मास अशा पद्धतीने उघडावासाफ करण्यासाठी कधीही अशाप्रकारे उघडू नयेकारण आतील काचेला ओरखडा देखील आला तरी गार-गरम रहाण्याच्या वेळेत फरक पडू शकतो

          नुसती काच आपल्याला गृहोपयोगी वस्तू विकणाऱ्या दुकांनांत मिळू शकतेपरंतु आजकाल फारच कमी दुकानदार अशी सेवा देतातयाचे कारण असे आहे की , )काच असणाऱ्या थर्मास चा वापर फारच कमी झाला आहे)थर्मासचे अनेक आकार  साइज आहेत  प्रत्येकाची काच त्याप्रमाणे वेगवेगळी असतेतुटफूट होण्याच्या शक्यतेने काचांची साठवणूक करणे शक्य होत नाहीकाचेची किंमत थर्मासच्या निम्म्या किमती पेक्षा जास्त असू शकतेथोडक्यात तीनशे रुपयांचा थर्मास फुटला तर त्याच्या फक्त काचेसाठी जर दीड-दोनशे रुपये  खर्च करावे लागले तर ते जास्त वाटतांतमिल्टन , सेलो सारख्या कंपन्यांच्या थर्मास ची काच बदलून मिळू शकते परंतु या कंपन्यांची सर्वीस सेंटर काही ठराविक ठिकणीच आहेतया सर्वांमुळे नवीन थर्मास घेणे अधिक सोयीस्कर वाटू शकते

            टिप : आतून काच असणारा थर्मास सर्वात आरोग्यदायी आहे परंतु तो वेळच्या-वेळी काळजीपूर्वक  स्वच्छ करणे जरूरी आहे

           असो,या लेखांत काचेच्या थर्मास विषयी आपण संपूर्ण माहिती घेतली आहेलेख आवडला असल्यास आपल्या paisevasool18 ब्लॅागला फॅालो कराआपले विचार कॅामेंट मध्ये लिहा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॅाग मध्ये संपूर्ण अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत की ज्यामुळे कोणत्याही वस्तू विषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,तरीही काही कमतरता जरुर राहू शकतात. कृपया आपल्या सूचना व मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. आपले विचार जरुर नोंदवा व ब्लॅागला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!