White Metal व्हाइट मेटल व दैनंदिन जीवनात व्हाइट मेटल चा वापर

 व्हाइट मेटल  दैनंदिन जीवनात व्हाइट मेटल चा वापर 

       नमस्कार ,सोने,चांदीतांबे हे धातू तर सर्वांना माहित आहेत फक्त त्यांच्या किमती मुळे ते दुर्मिळ आहेतॲल्युमिनियमची भांडी  पितळ , स्टिल यांसारख्या मिश्र धातूंच्या विविध वस्तू  भांड्यांचा आपण फार मोठ्याप्रमाणांत वापर करतोयाचं बरोबर व्हाइट मेटल चा वापर दैनंदिन जीवनात वाढत चालला आहेतर हे व्हाइट मेटल नेमके काय आहे ? त्याचा उपयोग , टिकाऊपणा , किंमत  त्याचा वापर यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत


White metal


                 

                  व्हाइट मेटल काय आहे ?
               What is white metal 

       खरे तर ॲल्युमिनियम,चांदी, पॅलिडियम,प्लॅटिनम हे सर्व व्हाइट मेटल आहेतम्हणजे रंगाने पांढरे,परंतु यांचे स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे त्यांना व्हाइट मेटल संबोधले जात नाहीत्याऐवजी स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या धांतूंच्या मिश्रणातून बनविल्या जाणाऱ्या पांढऱ्या किंवा चंदेरी धातूला व्हाइट मेटल बोलले जातेशिसेजस्त,टीन,कॅडमियम,बिस्मत यांसारख्या धातूंच्या मिश्रणांतून  यांमध्ये इतर धातू एकत्र करून तयार होणारा पांढरा धातू सदृश्य पदार्थ म्हणजे व्हाइट मेटलऔद्योगिक दृष्टीने व्हाइट मेटल चा वापर पूर्वीपासून होत आला आहेदैनंदिन जीवनांत मात्र याचा वापर अगदी नजिकच्या तीस - चाळीस वर्षात सुरू झाला आहे

               जर्मन सिल्व्हर हे  व्हाइट मेटल पेक्षा थोडे महाग आहे.नाजूक,कलाकुसरी च्या वस्तूंसाठी हे वापरले जातेतांबे,जस्त  निकेल धातूंच्या मिश्रणातून जर्मन सिल्व्हर बनविले जाते

            स्टर्लिंग सिल्व्हर चांदी  तांबे यांच्या मिश्रणातून बनविले जाते  ते देखील महाग असते

            थोडक्यात व्हाइट मेटल जर्मन सिल्व्हर  स्टर्लिंग सिल्व्हर पेक्षा वेगळे आहे

                   दैनंदिन जीवनांत का आणि कसा शिरकाव झाला व्हाइट मेटल चा ? 
     How we start to use white metal 


White metal gift articles

              माणूस नेहमी नाविण्याच्या शोधात असतोसोन्या बरोबर चांदी देखील आपल्याला आकर्षित करणारा धातू आहेचांदीला स्वस्त पर्याय म्हणून व्हाइट मेटल कडे बघितले गेले.व्हाइट मेटल च्या दहापट जास्त चांदी ची किंमत पडते व्हाइट मेटल दिसायला चांदी सारखेच दिसतेत्यामुळे चांदी सारख्या दिसणाऱ्या शोभिवंत वस्तू व्हाइट मेटलपासून बनविल्या जाऊ लागल्याशिवाय साधारण वातावरणात व्हाइट मेटल चांदी सारखे काळे पडत नाही यामुळेच व्हाइट मेटल चा वापर होऊ लागला


           व्हाइट मेटल चा वापर आपण कोठे करु शकतो ?                                         What and where to use white metal ?


White metal gift articles

             व्हाइट मेटल चा वापर मुख्यत्वे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जातोराजहंस किंवा बगळ्यांची जोडीहत्तीमोर ,दरवाज्यावर किंवा भिंती वर अडकविण्या सारखे शो पीस , फ्लॅावर पॅाट,चौरंगपाट , दिवे,समयादेवी-देवतांच्या मूर्तीप्रतिकृती  इतर अनेक शोभिवंत वस्तू व्हाइट मेटल पासून तयार केल्या जातातलग्नसण ,उत्सव,सभारंभात वापरतां येतील अशा अनेक सजावटीच्या  सुंदर वस्तू व्हाइट मेटल पासून बनविल्या जातातकमी खर्चात सणसभारंभांची शोभा खूप जास्त प्रमाणांत वाढवतात.


White metal gift articles


          ॲल्युमिनियम प्रमाणे व्हाइट मेटल चा उपयोग  रोज वापरण्याची भांडी बनविण्या साठी होऊ शकत नाहीकारण अशी भांडी स्टील पेक्षा खूप महाग होतील  स्टीलच्या भांड्यां सारखी उपयोगी ठरणार नाहीत


           व्हाइट मेटल च्या वस्तू वापरण्याच्या फायदा 
    Benefits of white metal products 

        व्हाइट मेटल चांदी पेक्षा खूपच स्वस्त आहेशिवाय तांब्याच्या वस्तूं पेक्षा व्हाइट मेटल च्या वस्तूंची किंमत कमी असते

        व्हाइट मेटल पासून अनेक शोभिवंतसुंदर वस्तू बनविल्या जातातया वस्तू आपल्या घर,ॲाफिस , दुकानाची शोभा वाढवतात

        चांदी साधारण वातावरणात देखील काळी पडतेतांबे  पितळ ची भांडी वारंवार घासावी लागतात नाहीतर त्यांवर डाग येतातलोखंड  पोलादाच्या वस्तू  वापरतां पडून राहिल्या तर गंज पकडतातयाउलट व्हाइट मेटल वर वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाहीवर्षानुवर्षे व्हाइट मेटल आहे त्या अवस्थेत राहू शकतेना गंज पकडत किंवा ना डाग पडतात

            या वस्तू साफ करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट  पावडर,जेल किंवा पॅालिश ची जरूरी पडत नाहीआपल्या रोजच्या वापरातील साबणपाण्याचा आपण उपयोग करू शकतो


           व्हाइट मेटल चे काही अवगूण
          Drawbacks of white metal 

         व्हाइट मेटल चांदी किंवा तांबे सारखा लवचिक धातू नाहीपितळ पेक्षा ही काहीसा कठीण आहेत्यामुळे व्हाइटमेटल पासून बारीक,नाजूक कलाकुसरीच्या वस्तू बनविणे अवघड होतेअधिक मेहनतीचे  खर्चिक होतेत्यामुळे व्हाइट मेटल पासून बनविलेल्या छोट्या मूर्ती फारशा रेखिव नसतात

            व्हाइट मेटल ला वेल्डिंग करता येत नाहीयामुळेच वापरातील भांडी बनविणे शक्य होत नाही.                         व्हाइट मेटल ची वस्तु घेताना शक्यतोवर ती भरीव असावी की जेणेकरुन पडली तर तुटणार नाही अशाप्रकारचीकारण या वस्तू तुटल्या तर त्यांना पुन्हा जोडणे जवळ-जवळ अशक्य आहे

            तांब्याच्या किंवा पितळेच्या तुटलेल्या वस्तू मोड देवून आपण नविन घेऊ शकतो परंतु व्हाइट मेटल च्याबाबतींत असा कोणताही पर्याय नाहीखराब झालेल्या या वस्तूं लोखंडापेक्षा कमी भावांत विकायला लागतात


             व्हाइट मेटल च्या वस्तूंची निगा
         Care of white metal items 

           वातावरणाचा जरी या वस्तूंवर फारसा परिणाम होत नसला तरी हवेतील धुळी कणांमुळे या वस्तू काही काळानंतर निस्तेज दिसू लागतातत्यासाठी अतिशय सोपा उपाय आहेअगदी साध्या स्वच्छ कॅाटन कापडाने वस्तू चांगली,व्यवस्थित पुसून घेणे

     वस्तूं वर जर काही डाग असतील तर ते सहजी काढतां येतातत्यासाठी आपल्याला कोलगेट सारख्या पांढऱ्या दंतमंजन पावडर चा उपयोग करावा लागतोकोलगेट पावडर ने थोडे चोळले की डाग निघून जातात

         जरूर पडल्यास या वस्तू आपण धुऊ देखील शकतोत्यासाठी आपल्या नेहेमीच्या भांड्यांच्या साबणाचा किंवा जेल चा आपण वापर करू शकतोफक्त कोणत्याही घासणीचा उपयोग करणे टाळावेयामुळे वस्तूं वर स्क्रैचेस येऊ शकतातवस्तू च्या सौंदर्यांत बाधा येते.  



            किंमत व्हाइट मेटलच्या वस्तूंची 

        Price of white metal products 

          चांदी , तांबे , पितळ यांची किंमत मुख्यत्वे वजनावर ठरतेव्हाइट मेटल च्या वस्तूंच्या बाबतींत मात्र असे नाहीहे वजनावर विकले जात नसले तरी इतर धातूंप्रमाणे याच्या वजनदार वस्तू महाग तर पोकळ  वजनाला हलक्या वस्तू स्वस्त  मिळतात.        


            मुख्यत्वे वस्तू चे वजन,चमकडिझाइन , कलाकुसर  यानुसार वस्तू ची किंमत असतेवस्तू जेवढी जास्त मनांत भरणारी असेल तेवढी त्याची किंमत देखील जास्त असतेएकाच वजनाच्या दोन वेगवेगळ्या वस्तूंच्या किमतीत दुप्पट फरक असू शकतो

           व्हाइट मेटल चा पत्रा लावलेले चौरंग अगदी पन्नास रुपयांपासून मिळतातअर्थात ते दोन-तीन इंच लहान आकाराचे असतात,पण पूजेसाठी किंवा लग्नासाठी वापरला जाणारा दोन पाट  एक चौरंग असा सेट एक हजार रुपयांत चांगल्या क्वालिटी चा मिळतोयांवर लावलेला व्हाइट मेटल पत्रा जाड असतो.

           भिंतीवर लावण्याची सूर्य प्रतिमा आकार  जाडीनुसार शंभर रुपये ते हजार रुपये पर्यंत असू शकते

          चार इंच उंचीची हंसांची जोडी दोनशे रुपयांत मिळते तर चौदा इंचांची चौदाशे रुपयांना मिळू शकते

              व्हाइट मेटल च्या वस्तूंची किंमत चांदी पेक्षा खूपच स्वस्त  तेवढ्याच वजनाच्या  डिझाइनच्या तांबे किंवा पितळ च्या वस्तूं पेक्षा थोडी कमी असू शकतेउदाहरणार्थ एक सारख्या वजनातील  डिझाइन ची पितळ  व्हाइटमेटल समई ची आपण तुलना केली तर व्हाइट मेटल समई साधारणतदहा ते वीस टक्के कमी किमतीत मिळते

चार इंच उंचीची समई दोनशे रुपयात मिळू शकते तर एक फूट हजार रुपयात मिळते

             अर्थात आपण कोठे खरेदी करतो त्या ठिकाणावर देखील किंमत अवलंबून आहेजेथे या वस्तू तुरळक प्रमाणांत मिळतात तेथे अर्थातच किंमत जास्त असतेतसेच ब्रॅंडेड मॅाल किंवा ॲानलाइन देखील या वस्तू थोड्या महाग मिळू शकतातॲानलाइन मुळे फायदा हा होतो की आपल्याला आवडलेल्या वस्तूची किंमत आपल्या लक्षात येतेत्या तुलनेने आपण योग्य किमतीत वस्तू खरेदी करू शकतो

              असो , या पैसा वसूल मराठी ब्लॅाग मध्ये आपण व्हाइट मेटल बाबत बरेच काही जाणून घेतले आहेअशाप्रकारे विविध वस्तूं बाबत जाणून घेण्यासाठी आपल्या पैसा वसूल मराठी ब्लॅाग ला फॅालो करानवीन विषयांवरील माहिती आपल्याला वेळच्या वेळी मिळत राहिल .जयहिंद ! जय महाराष्ट्र !!

टिप्पण्या