- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Plastic Lemon Squeezer
लिंबू पिळण्यासाठी वेग-वेगळी प्लॅस्टिकची यंत्र स्वस्त व मस्त
![]() |
| Plastic Lemon Squeezer |
नमस्कार, उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वात उत्तम पेय म्हणजे लिंबू सरबत ! हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. लिंबू सहजी उपलब्ध असतात. पटकन त्याचे सरबत बनवतां येते व झटकन माणूस ताजातवाना होतो. त्यामुळे लिंबू सरबताचे आपण रोजच सेवन करतो ,उकाड्याच्या दिवसांत !,
लिंबू सरबत बनविण्यासाठी हाताने जोर लावून लिंबू पिळावे लागते. मेहनत करुन ही समाधानकारक काम होत नाही कारण लिंबू पूर्ण पिळलाच जात नाही.
याला पर्याय म्हणून अनेक प्रकारची लिंबू पिळण्याचे यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. यापैकीच सर्वात स्वस्त म्हणजे प्लॅस्टिकचे लिंबु पिळण्याचे यंत्र,आपण यांतील काही चांगले प्लॅस्टिकचे लिंबु पिळण्याचे प्रकार जाणून घेऊयात.
प्लॅस्टिकचे लिंबु यंत्र अगदी १५-२० रुपयांपासून मिळतात परंतु एवढे स्वस्त असणारे कधीही घेवू नये . पैसे वाया जातात .कारण हे फार दिवस टिकत नाहित. मुख्य म्हणजे यातून लिंबु व्यवस्थित पिळलाच जात नाही.
चांगले काम करणारे लिंबू यंत्र साधारणत: ५० ते १५० रुपयांना मिळतात.
Plastic Lemon Squeezer
टिकाऊ लींबू मशीन पाहिजे असले तर ते कमीत-कमी ५०/- रुपयां पर्यंत मिळते. हे दिसायला साधारणत: असे असू शकते. याला पुढे बाॅटल ओपनर ही दिसलेले आहे कि ज्यामुळे सोडा,पेप्सी बाॅटल आपण उघडू शकतो. परंतु या ओपनर चा उपयोग क्वचितच करावा. रोजच्या जोरदार वापरा मुळे हे तुटण्याची शक्यता नाकारतां येत नाही. तरी देखील हे लिंबु यंत्र टिकाऊ आहे. फक्त लिंबु पूर्णत: पिळला जात नाही. याप्रकारे काही अंशी शिल्लक राहणार.
अशावेळी २-३ वेळा लिंबु यांत ठेवून दाबावे लागते. पूर्ण पिळले न जाण्याचे कारण हे आहे की या मशीन ला फारसा खोलगट पणा नाही ,आपण ज्यात लिंबू ठेवतो, त्या खालच्या व जो वरुन दाबणार आहोत त्या वरच्या भागांत बऱ्यापैकी गॅप शिल्लक राहते. त्यामुळे लिंबु पुरेसे पिळले जात नाही.
लिंबु पूर्ण पिळण्यासाठी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतात. ७५ ते १०० रुपयांपर्यंत या प्रकारचे लिंबू मशीन मिळते. हे थोडे अधिक चांगल्या क्वालिटी प्लॅस्टिक चे आहे. याला चांगला खोलगट पणा आहे. लिंबू यांत व्यवस्थित राहतो.लिंबु पिळताना वरील भाग ,खालील पार्ट च्या जवळ-जवळ तळाला टच होतो त्यामुळे लिंबु चांगले पिळले जाते.
हे आणखी एक प्रकारचे लिंबु यंत्र आहे. यांचे दोन वेगवेगळे भाग होतात. खालील भागांत लिंबु अर्धे कापून ठेवायचे. त्यांवर वरील पार्ट ठेवायचा, या दोन्ही पार्ट वर बाणांचे चिन्ह असते .लिंबू ठेवल्यावर हे बाण समोरासमोर येणे जरुरी असते. अशाप्रकारे ठेवल्यावर दोन्ही हॅंडल एकमेकांजवळ आणायची. हे लिंबु यंत्र वापरण्यास सर्वात सोपे आहे जोर कमी द्यावा लागतो. बाकीचे मशीन वापरताना दोन्ही हातांनी जोरात दाब द्यावा लागतो. हे मात्र अलगदपणे काम करते. लिंबु रस यातून पूर्ण निघतो परंतु काही वेळेस बिया व चोथा देखील रसात मिसळला जातो. हे मशीन ₹१५०/- च्या आसपास मिळू शकते.![]() |
| New Lemon Squeezer |
Plastic Lemon Squeezer
अजून एक नवीन प्रकार चे लिंबू यंत्र हे आहे. संत्री, मोसंबे ज्युसर प्रमाणे. याला फक्त दोनच पार्ट असतात. खालील होHow डीसारखा दिसणारा व वरील होडी च्या शिडासारखा. हे दोन्ही भाग वेगळे होतात . वरच्या भागांत फक्त एक खाच असते त्यामध्ये खालील पार्ट अडकून बसतो व चांगली गोष्ट ही कि वापरताना हे भाग कधीही निसटत नाहीत परंतु साफ करण्यासाठी अतिशय सहजतेने वेगळे करु शकतो.
लिंबू पाणी बनविण्यासाठी हे मशीन एका ग्लासवर ठेवायचे. याच्या वरील टोकावर अर्धे कापलेले लिंबु ठेवून फक्त गोल फिरवायचे.
बियावरती राहतात व ज्युस ग्लासात जमा होतो. संत्री,मोसंबी साठी देखील याचा उपयोग होईल. हे आकाराने छोटे,हाताळण्यास सोपे,साफ करण्यासाठी इझी आहे. यामुळेच पर्स मध्ये ठेवून सहजपणे कॅरी करु शकतो ,कुठेही ! केव्हाही लिंबू रस सेवन करता येवू शकते. मुख्य म्हणजे २-४ भांडी खराब करावी लागत नाहीत. अगदी बाॅटल मध्ये देखील लिंबू रस बनवू शकतो. हे लिंबु यंत्र ६० ते १०० रुपयांपर्यंत मिळू शकते.
वर वर्णन केलेल्या लिंबु यंत्रांव्यतिरिक्त अजून ही काही बाजारात उपलब्ध आहेत. परंतु वरील सर्व प्रकार मी वापरुन पाहिलेले आहेत. माझा व्ययक्तिक अनुभव मी आपल्या समोर मांडलेला आहे. यांची फिक्स किंमत न सांगतां ,दरम्यान ची किंमत सांगण्याचे कारण असे की,एकच डिझाइन चे मशीन अनेक कंपन्या बनवितात. प्रत्येक कंपनीची किंमत वेग-वेगळी आहे. याशिवाय प्रत्येक रिटेल दुकानात एकाच मशीन ची किंमत देखील वेगळी असू शकते,कारण या मशिन्सची एमआरपी थोडी जास्त आहे. एमआरपी पेक्षा कमी किमतीत या मशीन्स मिळतात. ॲानलाइन ॲमेझॅान/फ्लिपकार्ट वर हे लिंबु पिळण्याचे मशीन्स मिळू शकतात. मात्र ॲानलाइन अशा वस्तूंची खरेदी महागात जाते असा माझा अनुभव आहे. आपला काय अनुभव आहे,जरुर नोंदवा खाली काॅमेंट मध्ये. आपल्या अनुभवाने एकमेकांस सहाय्य व्हावे म्हणून हा खटाटोप. आपणांस हा लेख पटला असल्यास पुढे शेअर करा,इतरांनाही काही फायदा होईल. अशाच काही फायद्याच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या पैसा वसूल मराठी ब्लॅाग ला भेट देत जा. ! जय महाराष्ट्र !!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
या ब्लॅाग मध्ये संपूर्ण अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत की ज्यामुळे कोणत्याही वस्तू विषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल,तरीही काही कमतरता जरुर राहू शकतात. कृपया आपल्या सूचना व मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. आपले विचार जरुर नोंदवा व ब्लॅागला फॅालो करा. जयहिंद ! जय महाराष्ट्र !!