Metal Lemon Squeezer
लिंबु पिळण्यासाठी धातूंचे मशीन्स
नमस्कार , उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार लिंबू सरबत अमृता समान वाटते ना ? पण या अमृता साठी थोडे कष्ट घ्यावे लागतात ना ? सरबताचा आस्वाद घेण्यासाठी लिंबु अर्धे कापून ते व्यवस्थित पिळून घ्यावे लागते ना ? हे थोडे कष्ट हलके करण्यासाठी अनेक प्रकारचे लिंबु पिळण्याचे मशीन बाजारात उपलब्ध आहेत. यांतील काही प्लॅस्टिक पासून बनविलेली आहेत तर काही स्टिल,ॲल्युमिनियम, हिंडालियम यांपासून ! आज आपण या धातूंच्या लिंबू पिळणी यंत्राबाबत जाणून घेऊयात,आपल्या पैसा वसूल मराठी ब्लाॅग वर !
 |
| Metal Lemon Squeezer |
Metal Lemon Squeezer
पण मेटल चे लेमन क्विजर का वापरायचे ? तर धातूंचे यंत्र वापरण्याच्या फायदा हा आहे कि हे प्लॅस्टिक पेक्षा दिर्घकाळ टिकतात,साफ-स्वच्छ करण्यासाठी,सोपे पडतात. प्लस्टिक आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक मानतात यांमुळे देखील स्टिल लिंबू पिळणी ला मागणी जास्त आहे.
स्टिल चे लिंबु पिळण्याचे यंत्र अगदी ५० रुपयांपासून मिळते परंतु शक्यतोवर ते घेवू नये.का ? तर कमी किमतीत मिळणारे हे यंत्र वजनाला हलके असते. कारण स्टिल च्या पातळ पत्र्या पासून बनविलेले असते. वापरताना हे काही तुटत नाही परंतु वापरुन झाल्यावर साफ करताना चटकन बोट कापले जावू शकते, लक्षपूर्वक न केल्यास ,एवढा याचा पत्रा पातळ असतो.
आणखी एक अडचण येवू शकते ,पातळ व हलके लिंबु यंत्र वापरताना ,ती असी की ,लिंबु पिळताना अचानक पणे, जोरदार चिमटा बसतो,आपल्या बोटाला. लिंबू मशीनच्या वरच्या व खालच्या हॅंडल मध्ये अचानक पणे आपले बोट अडकून चिमटा बसतो.आता हा अनुभव ज्यांना आला आहे त्यांना याची कल्पना आहे. अशा अनुभवाने आपण सर्वांना एकाच मांपात मोजतो परंतु असे नसते ! फक्त हलके-फुलके फारच स्वस्त किमतीचे मेटल चे लिंबू यंत्र घेवूच नये. मग कसे असावे ? तर काही व्हरायटी आपण खाली पहाणार आहोत.
 |
| Aluminium Lemon Squeezer |
Metal Lemon Squeezer
या फोटोत दाखविलेले ॲल्युमिनियमचे लिंबु यंत्र बऱ्याच वेळा आपण लिंबु पाणी विक्री करणाऱ्या गाडीवर पाहीलेले असू शकते. हे वापरण्यास सर्वात सोपे आहे. अर्धा कापलेला लिंबु खालील पार्ट मध्ये ठेवायचा वरुन दाब द्यायचा. जवळ-जवळ पूर्ण लिंबु पिळला जातो व रस ग्लास मध्ये जमा होतो. यामधून चिमटा बसण्याची शक्यता वाटते का ? नाही ना ? का? याच्या किनारीला धार नसते, हे पातळ नाही , त्यामुळे साफ सफाई करताना बोट कापली जाणार नाही. साफ करायला देखील सोपे ! आपल्या नेहेमीच्या साबण/ पावडर ने व घासणीने घासून चकाचक ठेवतां येते. १००/- रुपयांपर्यत हे मिळू शकते..हे उत्तम आहे ,टिकाऊ आहे परंतु मर्यादित , असे का .? जोरात पडले,आदळले गेले तर तुटण्याची शक्यता असते. किंवा लिंबाची मोठी फोड पिळताना यांत ठेवून जोरात दाबले तरी तुटण्याची शक्यता असते. पण व्यवस्थित वापरले तर चांगले टिकते. यामुळेच हे लिंबु-पाणी च्या गाडी वर पाहायला मिळते.
आपल्याला हे माहितच आहे की , ॲल्युमिनियम ची भांडी न वापरतां तसीच पडून राहिली तर त्यांवर डाग येवू शकतात. लिंबु यंत्रा चा वापर आपण पावसाळयात व हिवाळयात करतो का? फारशी गरज पडत नाही ना तेव्हा ? अशावेळी महिना-महिना ते एका कोपऱ्यात पडून राहू शकते. पडल्या-पडल्या ते खराब नाही का होणारं ? होऊ शकते ना? मग अशा परिस्थितीतही खराब ना होणारं मिळाले तर ? तर ते आहे हे!

हे लिंबु यंत्र वर वर्णन केलेले ॲल्युमिनियमचेच आहे फक्त त्यांवर कोटिंग केले आहे .निळा ,पिवळा,लाल या रंगांचे ही हे कोटिंग असू शकते. हे कलर कोटिंग सहजी निघणार नाही. या कोटिंग मुळे लिंबु पिळणी ची किंमत २०-२५ जास्त असते , साधारणत: ₹ १२५ /- पर्यंत.
यापेक्षा अधिक टिकाऊ पाहिजे असेल तर हिंडालियमचे उपलब्ध आहे. हे आकाराने व वजनाने ॲल्युमिनियम पेक्षा थोडे जास्त च आहे. लिंबू ठेवण्यासाठी खोलगट पणा देखील जास्त आहे . याचा फायदा असा की लिंबु जर मोठे असेल तरी काही अडचण नाही, मोठी लिंबाची फोड देखिल यांत राहू शकते. पटकन भरपूर प्रमाणातरस निघू शकतो.
पण जर लिंबु यंत्र आपल्याकडेच लहान आकाराचे असेल तर मात्र लिंबाच्या दोन फोडी करण्या ऐवजी चार फोडी कराव्या लागतात व एक-एक फोड मशीनमध्ये ठेवून प्रेस करावी लागते.
 |
| Hindalium Lemon Squeezer |
हिंडालियमचे हे लिंबु मशीन टिकायला उत्तम आहे. दिसायला ही सुंदर आहे. मग याची किंमत ही अर्थातच जास्त असणार ना ? हो तर ! हे ₹ १५० /- च्या पुढे च मिळणार. हे पूर्णत: भारतीय उत्पादन आहे,मात्र दोन चार कंपनीचे हे उत्पादन चांगले आहे. तरी २००/- रुपयांचे आतच हे मिळून जाईल.
काही लोकांचे स्टिल च्या भांड्यांवर थोडे जास्त च प्रेम असते. यामुळेच स्टिल चे लिंबू पिळणी यंत्र बनविणाऱ्या
जवळ-जवळ ५० कंपन्या असतील. त्यातील जेमतेम ८-१० कंपनीचे तेवढेच घेण्यासारखे आहेत. त्यातील काही फोटों मध्ये दाखविलेले आहेत.
 |
| Steel Lemon Squeezer |
यांची किंमत १०० ते २०० रुपये आहे. अगदी हलके जे घेवू नये ते ५० रुपयांपासून असतात व फारच उत्तम ७-८०० पर्यंत आहे, गंमत म्हणजे दिसायला सारखेच वाटतात सर्व लांबून ! जेव्हा जवळून पहाणार तेव्हा लक्षात येते, त्यांचे वजन , रेखिव पणा , फिनिशिंग वगैरे.,मग ७-८०० रुपयांवाले सर्वात वजनदार आहे काय ? नाही असे नसते , हे एवढे महाग असण्याने कारण असते याला पाॅलिश करायला येणाऱ्या खर्चा मुळे. याला मिरर पाॅलिश केलेले असते , अगदी आपल्या चेहऱ्याची आरशा सारखी प्रतिमा यांतुन दिसते. शिवाय याच्या किनारपट्टी अगदी गुळगुळीत केलेल्या असतात बोट कापू नये म्हणून. म्हणजे येथे फक्त स्टिल मटेरिअलची किंमत नाही तर ते घडविण्यासाठी जी जास्तच मेहनत घेतली जाते त्याचे पैसे असतात..हाच फरक येथील फोटोंमधील लिंबू यंत्रांमध्ये आहे.१००-१७०-२०० फिनिशिंग नुसार.
पण तुम्हाला खरी गम्मत सांगू का ? कोणत्याही स्टिल लिंबु यंत्रातून पूर्ण लिंबु पिळलाच जात नाही. लिंबु ठेवण्याच्या भागाला फारसा खोलगट पणा नसतोस त्यामुळे लिंबाची फोड २-३ वेळा उलट सुलट करुन वापरली की मगच त्यातुंन पूर्ण रस बाहेर पडतो. तरीदेखिल स्टिल टिकण्यास उत्तम व साफ करण्यास सोपे असल्यामुळे आपण स्टिललाच प्राथमिकता देतो.
वर वर्णन केलेले सर्व लिंबु मशीन्स मी वापरुन पाहिल्या आहेत , माझा अनुभव आपल्या समोर मांडलेला आहे. आपण यांतील कोणतेही वापरुन पाहिले आहे का ? आपला अनुभव जरुर सांगा खाली काॅमेंट सेक्शन मध्ये. हा लेख आपणांस योग्य वाटल्यास पुढे शेअर करा दूसऱ्यांस उपयोगी पडेल . अजून अशी उपयोगी वस्तुंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या पैसा वसूल मराठी ब्लाॅग ला फाॅलो करा ,जय महाराष्ट्र !!
वरील सर्व वस्तू ॲानलाइन देखिल उपलब्ध आहेत,परंतु ॲानलाइन या सर्व वस्तू थोड्या महागच मिळतात !
उत्तर द्याहटवा