Measuring cups and spoons : मेजरिंग कप व मेजरिंग चमचे

.

  1. मेजरिंग कप व मेजरिंग चमचे
    Measuring cups and spoons 

Why Measuring Cups ?            

           नमस्कार , मेजरिंग कप  चमचे,आजच्या माॅर्डन स्वयंपाक घराची गरज झालेले आहेतनिव्वळ भाजी-पोळी  वरण-भाताशिवाय केकबिस्किट,पिझ्झा,चायनिज,इटालीयन खाद्यपदार्थ आजकाल घरा-घरांत बनविले जातातहे सर्व पदार्थ उत्तम चवीचे होण्यासाठी त्यामधील सर्व घटक पदार्थ योग्य प्रमाणात घ्यावे लागतातहे पदार्थ आपण नेहमी बनवत नसतो,कधी ते प्रथमच बनवितअसतोअशावेळी अंदाज बांधून घटक पदार्थ घेतले तर चव बिघडू शकतेयामुळेच कोणत्याही खाद्यपदार्थांस उत्कृष्ट स्वाद,सुगंध,रंग व चव प्राप्त करण्यासाठी मेजरिंग कप  चमचे महत्वाची भूमिका बजावतात.
           खरेतर मेजरिंग कप ,कपासारखे दिसत नाहीतते दिसायला वाटी सारखेच असतात,फक्त त्यांना छोटेसे हॅंडल असते पण ते देखिल कपासारखे नसतेते असते साधारणतचहाच्या गाळणी सारखे परंतु फार आखूड,ज्याच्याने तो कप किंवा वाटी सहजी उचलतां येईलबरेचदा या हॅंडल वर कप चा साईज लिहिलेला असतोयाशिवाय कप च्या आत किंवा बाहेरील बाजूस कपाच्या साईज व मापाच्या खुणा केलेल्या असतातया मेजरिंग कप चा सेट मिळतोसेट मध्ये चार कप असतातकाही कंपनी पाच किंवा सहा नगांचाही सेट विक्री करतातचारही कप वेगवेगळ्या मापाचे असतात  हे माप एक कप,अर्धा कप,एक तृतीय अंश (1/3rd)  एक चतुर्थ अंश(1/4th) कप असे असतेहे कप प्लॅस्टिककाच,सिलिकाॅन ,स्टिल  तांबे यांपासून बनविलेले असू शकतात.या सर्वांमध्ये प्लॅस्टिक अर्थातच कमी किमतीला मिळतात

Measuring Cups Price            



प्लॅस्टिकचे मेजरिंग कप
Plastic measuring cups 
          प्लॅस्टिकचे कप अगदी २०-२५ रुपयांपासून ते २००-२५० रुपयांपर्यंत असू शकतात.प्लॅस्टिकची हलकी किंवा उच्चक्वाॅलिटी,कप ची जाडी,मजबूतीफिनिशिंग यांवर किंमत ठरतेअगदी साधारण क्वाॅलिटी चे हवे असतील तर ऐक्टिव्ह कंपनी चे मेजरिंगकप सर्वत्र उपलब्ध आहेत.हे २० ते ३० रुपयांत,रिटेल विक्री करणाऱ्या गृहोपयोगी वस्तू विकणाऱ्या दुकानात मिळतातक्वाॅलिटी साधी असली तरी माप मात्र बरोबर मोजतातचांगली क्वाॅलिटी हवी असेल तर ॲालटाइम कंपनी चा कप सेट मिळतो .याची किंमत ८५/- रुपये आहेहे देखिल बहुतेक दुकांनांमध्ये उपलब्ध असतात
प्लॅस्टिकचे मेजरिंग कप
All Time measuring cups 

            या व्यतिरिक्त अजून काही भारतीय कंपन्यांचे  चायनिज देखिल खूप व्हरायटी मिळतातआपल्याला जे योग्य वाटतील ते खरेदी करावेत .ॲानलाइन देखिल खूप व्हरायटी उपलब्ध आहेत परंतू मुंबई पुण्या च्या रिटेलमार्केट पेक्षा ॲानलाइन थोडेसे महाग आहेत असा माझा अनुभव आहे.
  टिकाऊ पाहिजे असतील तर स्टेनलेस स्टिल किंवा तांब्याचे उत्तम.त्यातही तांब्या चे कप सहजी उपलब्ध होणारं नाहीत,शिवाय ते परवडणाऱ्या किमतीत मिळणार नाहीतयामुळेच स्टिल चे मेजरिंग कप योग्य आहेत.शिवाय काम झाल्यावर स्वच्छ करण्यास सोपेस्टिल चा देखिल चार कप चा मिळून एक सेट येतो
स्टिल चे मेजरिंग कप
Steel measuring cups 

हा सेट २०० ते ३०० रुपयांपर्यंत मिळतो.अनेक कंपन्या बनवितात,प्रत्येक कंपनीची किंमत वेगवेगळी असते ,सर्वांचे माप मात्र सारखेच असते.  


Sizes of Measuring Cups 

              मेजरिंग कप चे जे चार स्टॅंडर्ड साइज आहेत,ते फुल कप किंवा  कप,अर्धा कप,/ कप  / कप असे आहेतसर्वात मोठा तो  कप साईज असतो बाकी पुढे क्रमाने सर्वात लहान तो एक चतुर्थ अंश (1/4 th) कप असतो कप साइज म्हणजे साधारणत२५०मिलीलीटर,अर्धा कप = १२५ मिली/ कप=८०मिली  / कप = ६० मिलीलिटर हे माप असतेपरंतु हे अगदी तंतोतंत माप नाहीयातही प्रत्येक कंपनी  मटेरियल प्रमाणे थोडा फरक पडतो म्हणजे एक कप = २४५ ते २६० मिलीलिटर असू शकतोपरंतु  ढोबळमानाने संपूर्ण जगभरात हे माप वापरले जाते.
               कप वर वजन का लिहित नाहीत ? फक्त एम.एल.चे माप का असते ? तर याचे कारण फार सोपे आहे,प्रत्येक घनरूप वस्तूंचे वस्तूमान व आकारमान यांत फरक असतोथोडक्यात  किलो गहू आपण दळून आणला तर पिठ पाच किलो मिळत नाही परंतु पिठ ठेवण्यासाठी डबा मात्र ज्यात  किलो साखर,तांदुळ,गहू राहू शकेल एवढा मोठा लागतोयाचाच अर्थ एक कप गहू किंवा साखर  एक कप पिठ यांचे वजन वेगवेगळे असते.एक कप साखर,गहू,तांदूळ साधारणत२०० ग्रॅम असते तर एक कप पिठाचे वजन साधारणत१२० ग्रॅम भरतेएक कप पोहे ९० ग्रॅम पर्यंत भरतातयामुळेच कोणत्याही पदार्थाचे परफेक्ट वजन आपल्याला कप चा वापर करुन सांगतां येणार नाही.यामुळेच वजनाचे मार्किंग कप वर दिसलेले नसते फक्त एम.एलमध्ये असते.  

How To Use Measuring Cups ?                                    

             आता महत्वाचा प्रश्न हा कि एक कप कसा भरुन घ्यायचा ? कोणत्या लेव्हल पर्यंत कप भरायचा ? का कपावर पीठाचा डोंगर भरुन घ्यायचा ? त्यासाठी पुढील मापदंड वापरला जातोपिठ,तांदूळ,साखर वैगेरे पदार्थाने कप पूर्णपणे भरुन घ्यायचा   नंतर एक बटरनाइफ किंवा सूरी घेवून ,सूरीची बोथट बाजू , किंवा बटरनाइफ,कपच्या वरच्या बाजूस स्पर्श करुन पुढे न्यायचा.
कप चे माप
Cup level 

 म्हणजे कप मधील वस्तू कपच्या वर पर्यंत पूर्ण एकसारखी लेव्हलवर होइलयापद्धतीने आपण सर्व कपांचा वापर करु शकतो  अर्धा ,पाव कप देखिल मोजू शकतो

   Measuring Spoons  

              याचं पद्धतीने आपण मेजरिंग चमच्यांचा वापर करु शकतो.बेकिंग सोडा,मिठ,हळद,मसाले यांचे प्रमाण ठरविण्यासाठी मेजरिंग स्पून उपयोगी पडतातया मापाच्या चमच्यांचा देखिल चार नगांचा सेट असतो
प्लॅस्टिकचे मेजरिंग चमचे
Plastic measuring spoons 

स्टिलचे मेजरिंग चमचे
Steel measuring spoons 

पाव टिस्पून,अर्धा टिस्पून,एक टिस्पून  एक टेबल स्पून अशा चार साइज मध्ये हे चमचे उपलब्ध असतात टेबल स्पून = १५ मिलीलिटर,तर  टि स्पून =  मिलीलिटर हे साधारण माप असतेअर्धा टि स्पून म्हणजे . तर पाव टिस्पून =.२५ एमएल ,असे मार्किंग चमच्यांवर लिहिलेले असते
          हे चमचे देखिल प्लॅस्टिक,सिलिकाॅन किंवा स्टिल मध्ये मिळतातयांची किंमत १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहेप्लॅस्टिकचे साध्या क्वाॅलिटिचे चमचे १५-२० रुपयात तर स्टिल चे चमचे २०० रुपयांत मिळतात

What is Use of Measuring Cups and Measuring Spoons ? 

             मेजरिंग कप  चमच्यांचा उपयोग काय होतो ? तर कोणताही पदार्थ बनविताना लागणारे जिन्नस चे योग्य प्रमाण यांच्यामुळे आपण ठरवू शकतोहे प्रमाण वजनाच्या हिशोबांत घ्यायचे असेल तर ते प्रत्येकालाच शक्य नाही  कारण प्रत्येक घरात वजन काटा असेलच असे नाहीशिवाय तो नवीन घ्यायचे झाल्यास किंमत ही जास्त मोजावी लागेलतो वापरणे देखिल अधिक किचकट  वेळ खाणारे आहे.त्यापेक्षा मेजरिंग कप  चमचे किमतीत कमी ,हाताळण्यास सोपे  सहज उपलब्ध होणारे आहेतयांचा उपयोग स्वयंपाक घरात तर खूपच जास्त प्रमाणांत होतोरेसिपी बनविण्या व्यतिरिक्त वाॅशिंग पावडरसाठी तसेच औषधांसाठी ,काढे बनविण्या साठी वस्तूंचे प्रमाण ठरविताना या कप  चमच्यांचा वापर होतोरेसिपी बनवून झाल्यावर इतर वेळी हे कप  चमचे आपण पिठडाळ ,तांदूळ ,मसाले यांच्या डब्यांत ठेवून वापरु शकतोत्या वस्तू काढून घेण्यासाठी.


Conclusion 


  1.            मला वाटते मेजरिंग कप  चमच्यां बद्दल बहुतेक सर्व माहिती या लेखांत सांगितली आहे तरी देखिल आपल्या काही शंका असल्यास खाली काॅमेंट मध्ये लिहा . हा लेख आवडला असल्यास पुढे शेअर करा म्हणजे इतरांनाही काही मदत होईलतसेच अशा वेगवेगळ्या वस्तूंची माहिती जाणून घेणायासाठी आपल्या “ पैसा वसूल मराठी “ ब्लाॅग ला फाॅलो कराजय हिंद ! जय महाराष्ट्र !!

टिप्पण्या