Gas Lighter Repairing ( Marathi )गॅस लायटर घरच्या-घरी कसे साफ व दुरुस्त करता येईल ?


Gas Lighter Repairing 

गॅस लायटर घरच्या-घरी कसे साफ व दुरुस्त करता येईल ?

Gas Lighter Repairing ,Gas lighter cleaning in Marathi
Repair Gas Lighter 

नमस्कार , गॅस लायटर आपल्या रोजच्या उपयोगातील वस्तु आहे. लायटर शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. परंतु आपण कधी ते लायटर जवळ घेवून निरखून पाहिले आहे का ? ते फारच अस्वच्छ असू शकते. त्याच्या हॅंडल वर घाण साचलेली असू शकते. कारण लायटर आपण कधीही घासत किंवा धुवत नसतो. परंतु जेव्हा ते नीटसे काम करीत नाही तेव्हा आपले त्याच्याकडे लक्ष जाते. १०-२० रुपयांचे ते असेल तर आपण मनावर घेत नाही. परंतु तेच जर १००-२०० रुपयांचे असेल तर मनाला लागते. अशावेळी ते आपण घरच्या-घरी सहज पणे दुरुस्त करु शकतो. ते कसे करता येईल हे आता पाहूयात.          


Gas Lighter Repairing


आपल्या नेहेमीच्या वापरातील लायटर असे असू शकते. लायटर साधारणत: असेच असतात.  लायटर  नादुरुस्त होण्याचे मुख्य कारण असते लायटर मध्ये पाणी जाणे, किंवा लायटर च्या तळाला खुप अधिक प्रमाणित कार्बन जमा होणे. हे प्राॅब्लेम आपण लायटर स्वच्छ साफ करुन सोडवू शकतो.   लायटर चे हॅंडल गोल फिरविले की  ते निघून येते. लाइटर चा नाॅब पहिले निघतो व लायटर च्या आतील भाग सुट्टे होवून , आपण प्रत्येक भाग एक -एक करुन बाहेर काढू शकतो. सर्व भाग काढताना ते सर्व एका लाइनीत मांडत जायचे , म्हणजे नंतर जोडताना गोंधळ होणारं नाही.

                                                                     


Gas Lighter Repairing

Gas Lighter Repairing ,Gas Lighter Cleaning
Gas lighter repair 
 बाजूच्याच फोटोत दाखविल्या प्रमाणे वेगवेगळे पार्ट असतात गॅस लायटर मध्ये. आपल्याला हे सर्व भाग साफ करण्यासाठी फक्त एक नॅपकीन व  वाॅशिंग पावडर पुरेशी आहे. लायटर चा बाहेरील मेटल सिलेंडर ,हॅंडल व नाॅब आपण गरम पाण्यात ,थोडी वाॅशिंग पावडर मिक्स करुन ,साधारणत: एक तास भिजत ठेवायचे. बाकीचे पार्ट नॅपकीन व साबणाच्या वाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचे. नंतर मेटल पार्ट देखील स्वच्छ कोरडे करुन
 घ्यायचे.गॅस लायटर

लायटर खराब होण्याचे हे देखील एक कारण असू शकते की वरील पैकी  एखादा  तुटलेला असू शकतो. अशावेळी आपण तुटलेला भाग बदलू शकतो . हे पार्ट हार्डवेअर च्या दुकानांत मिळू शकतात.सर्व पूर्ण साफ झाल्यावर खाली फोटोत दिसत असल्या प्रमाणे सर्व पार्ट चकाचक दिसतील. 

                                                         


Gas Lighter Repairing

Gas Lighter Repairing ,Gas lighter cleaning
Gas lighter cleaning 

                                                                      आता आपल्याला हे सर्व पुर्वी प्रमाणे जोडावे लागतील. तर वरील फोटो समोर ठेवून सहज पणे आपण हे करु शकतो. आपले लाइटर अगदी नवीन असल्या प्रमाणे दिसेल. हे सर्व करण्याचा उद्देश हा आहे की जर आपण चांगल्या कंपनीचे लायटर,जास्त पैसे देवून विकत घेतो,तर आपले पैसे वाया जावू नयेत. आपले पैसे पूर्ण वसूल होईपर्यंत ते टिकायलाच पाहिजे. व्यवस्थित वापरले तर खरेच ते १५-२० वर्ष देखील टिकू शकेल ,असा माझा अनुभव आहे. 

आपला अनुभव जरुर सांगा



टिप्पण्या